भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा चिंचवड किवळे, काळेवाडी थेरगाव आणि सांगवी मंडलाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती पत्राचे वाटप कऱण्यात आले.अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून देशातील महिलांचा विकास व सबलीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच महिलांच्या नेतृत्वात देशाच्या विकासाची चर्चा व्हायला हवी यासाठी लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले आहे. भाजपा महिला सशक्तीकरणाच्या केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करते हे सर्व महिलांपर्यंत पोहोचवावे. सर्वांनी घरोघरी जाऊन पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी आणि राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना व त्याचा लाभ पोहोचविण्याचे काम जोमाने करावे. मा. नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन मा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांनी केले.
यावेळी सरचिटणीस श्री. नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते श्री. राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. काळूराम बारणे, माजी नगरसेवक श्री. राजेंद्र गावडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सौ. सुजाताताई पालांडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ.भारतीताई विनोदे, माजी नगरसेवक श्री.राजेंद्र गावडे, माजी नगरसेविका श्रीमती आरतीताई चोंधे, सौ.मनीषाताई पवार, महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ. कविता हिंगे, सौ. भारती विनोदे, मंडल अध्यक्ष श्री. प्रसाद कस्पटे, श्री. सोमनाथ भोंडवे, श्री. संदीप नखाते, सौ.शोभाताई जांभूळकर तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.