महिला दिनानिमित्त महिला पालकांच्या स्पर्धा

0
222

थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेत महिला दिनानिमित्त महिला पालकांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रणाली मांडवीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर विश्वता कांबळे, रिजवाना शेख यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आला तसेच रेश्मा इनामदार, कोमल साळुंखे, अर्चना गायकवाड .यांना वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांसाठी उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.

महिला शिक्षकांच्या गटात अनुक्रमे राधिका भोईटे, छाया थोरात ,आरती पवार यांनी क्रमांक पटकावले., या स्पर्धेचे परीक्षण दिपाली नवले, उमा आनंदकर ,मुक्ता धोंडगे यांनी केले. याचबरोबर मुलींसाठी कर्तुत्वान स्त्रिया या विषयावर वेशभूषा स्पर्धा व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संगीता पगारे व मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी पूनम बोपर्डेकर, संजीवनी सुतार, उमा आनंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दिलीप थोरात, संतोष जंगम यांनी केले.