महिलांवर अत्याचार केलेल्या भाजपाच्या आयटी सेल पदाधिकाऱ्यांचा निषेध

0
190

पिंपरी, दि. ६ (पीसीबी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने वाराणसी येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी महिलेवर केलेल्या अत्याचाराविरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे आंदोलन घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप म्हणाले की अमित शहा गृहमंत्री असताना देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहे आणि वाराणसीमध्ये झालेल्या प्रकरणात तर आयटी सेलचेच पदाधिकारी आहेत. भाजपचे खासदार आमदार महिलांवर अत्याचार करण्यात आघाडीवर असतात.ही भारतीय जनता पार्टी आहे का बलात्कार पार्टी आहे असे काशिनाथ जगताप म्हणाले.

प्रदेश सरचिटणीस राजन नायर म्हणाले की भाजपची विचारसरणी कायम महिला विरोधी आहे आणि त्यातूनच त्यांच्या कार्यत्यांकडून असे कृत्य होत आहे. मुख्य प्रवक्ते माधव पाटील म्हणाले की भाजप ही वॉशिंग मशीन आहे आणि गुन्हेगारांना माफ करण्यात भाजप कायम पुढे असते. अर्बन सेल अध्यक्षा ज्योती जाधव,अल्पसंख्यांक अध्यक्ष अल्ताफ शेख,प्रतिभा वाघमारे,सुप्रिया कवडे यांनीही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या कृत्याचा निषेध केला.

यावेळी शहर उपाध्यक्ष अनिल भोसले, सचिव योगेश सोनवणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,कामगार सेल अध्यक्ष संदीप शिंदे, भोसरी विधानसभा विध्यार्थी अध्यक्ष नितीन मोरे, ओबीसी सेल भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष माळी, उद्योग व्यापार सेलचे चिटणीस बापू सोनवणे विजय बाबर,संघटक विवेक विधाते, झोपडपट्टी सेल अध्यक्ष गणेश काळे, सुधीर अवचिते रोहन वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला.