पिंपरी, दि. १ (पीसीबी)-महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर रहावे.वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून स्वत: बरोबर कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करावा असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी केले.जिजाऊ सांस्कृतिक भवन, संत तुकाराम नगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हा पदाधिकारी व सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव,जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारणी सदस्या स्मिता म्हसकर,मराठा सेवा संघ शहराध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे, वैभव जाधव,नंदा शिंदे,मोहन जगताप,दिलीप गावडे,शोभा जगताप इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी नियुक्तया प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी जाहिर केल्या.जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभाग अध्यक्ष पदी सुनिता शिंदे यांची निवड करण्यात आली.जिजाऊ ब्रिगेड पुणे ( पश्चिम) जिल्हाध्यक्ष पदी मनिषा हेम्बाडे तसेच पिंपरी चिंचवड जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष पदी सुलभा यादव तर मार्गदर्शक पदी रत्नप्रभा सातपुते यांची निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच मराठा सेवा संघ वधूवर कक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मोहन जगताप यांचा नियुक्तीपत्र देऊन प्रकाश जाधव यांनी सत्कार केला.
या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके पुढे म्हणाल्या की,नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्य क्षेत्रात सभासद नोंदणी मोहीम राबवावी.तालुका,जिल्हा पदाधिकारी निवडी कराव्यात. महिलांमधे जागृती निर्माण करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत.महिलांना उद्योग व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यास हातभार लावावा.यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव,शहराध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता शिंदे,वधूवर कक्षाचे मोहन जगताप,वैभव जाधव,नंदा शिंदे,दिलीप गावडे,सुलभा यादव यांनी मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणी सदस्या स्मिता म्हसकर यांनी केले.या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड,मराठा सेवा संघ,जेष्ठ नागरिक संघ,संभाजी ब्रिगेड,वधूवर कक्ष,ह्युमन डेव्हलपमेंट असोसिएशन इत्यादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन मराठा सेवा संघ संत तुकाराम नगर शाखा अध्यक्ष दिलीप गावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर यांनी केले होते.यावेळी माणिक शिंदे,शितल घरत,शालन घाटूळ,अश्विनी पाटील,लिना रणपिसे या महिलांची प्रमुख उपस्थिती होती.