महाहाविकास आघाडी संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर भिक मागो आंदोलन करण्यात आले.

0
65

दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरत असलेल्या जागेतील काही एकर जागा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी महानगरपालिकेने विकत घेतली.या ठिकाणी छ.संभाजी महाराजांचा शंभर फुटी भव्य दिव्य पुतळा व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. ही शहराच्या तसेच शिवशंभू प्रेमी जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे.छ. संभाजी महाराज पुतळ्याचे काही भाग शिल्पकाराने महानगरपालिकेकडे पाठवले आहेत.पायातील मोजडी सह काही भागास तडे गेल्याचे नुकतेच उघडकीस आले.यामुळे सदर कामाचा दर्जा निकृष्ट असून यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा संशय शहरातील नागरीक व्यक्त करत आहेत.सदर स्मारकाचे काम दुसर्या ठिकाणी महानगरपालिकेने सुरू केले होते.सदर जागेत तब्बल साडे पाच कोटी रूपये खर्च केल्या नंतर महानगरपालिकेने हे काम थांबवले व नविन जागेत सुरू केले.यामुळे महानगरपालिकेचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले.या सर्व बाबींची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी.यामधे दोषी असलेले महानगरपालिका आयुक्तांसह सर्व दोषींकडून झालेले नुकसान भरपाई वसूल करावे. स्मारकाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी तज्ञांची समिती स्थापन करावी अशी मागणी केली आहे.यावर तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराच देण्यात आला