महाशिवरात्री निमित्त पिंपळे सौदागर येथे ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0
211

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) -पिंपळे सौदागर येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवशंभो सेवा मंडळतर्फे महाशिवरात्री महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाचे आज दि ६ मार्च रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मा.विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक श्री .विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते विणापूजन व ग्रंथराज ज्ञानेश्वरीपूजन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मा. उपमहापौर प्रभाकर वाघिरे, शिवशंभो मंडळाचे संस्थापक ह.भ.प. ज्ञानेश्र्वर हांडे, मंडळाचे अध्यक्ष अनिल काटे, माजी अध्यक्ष चंद्रकांत मुरकुटे, बाळासाहेब काटे, गणेश काटे, संपत मेटे, ह.भ.प. विलासआण्णा काटे, नंदकुमार काटे, बाळासाहेब भुंडे, जयसिंग चव्हाण, बाळासाहेब काटे, उत्तम धनवटे, शंकर चोंधे, भरत काटे, दत्तात्रय काटे, सुरेश कुंजीर, शंकर भालेकर, ऋषिकेश कुटे यावेळी सर्व पदाधिकारी व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बुधवार दि. ०६ मार्च ते १३ मार्च २०२४ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहच्या दरम्यान विविध नामवंत महाराजांचे सुश्राव्य किर्तन सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. बुधवार दि. ०६ मार्च ह.भ.प समाधान महाराज शर्मा (बीड), गुरुवार दि. ०७ मार्च ह.भ.प. उध्वव महाराज मंडलिक (नेवासा), शुक्रवार दि. ०८ मार्च ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे (ओझर), शनिवार दि. ०९ मार्च ह.भ.प. जगन्नाथ महाराजच पाटील (मुंबई), रविवार दि. १० मार्च ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (परळी वैजनाथ), सोमवार दि. ११ मार्च ह.भ.प. आसाराम महाराज बडे (आळंदी), मंगळवार दि १२ मार्च ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे (देहु, भंडारा डोंगर), बुधवारा दि. १३ मार्च ह.भ.प. कान्होबा महाराज देहूकर (पंढरपूर), यांचे काल्याचे कीर्तन होणार असून महाप्रसादाची वेळ दु.१ ते ४ पर्यंत आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे शिवशंभोसेवा मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.