महाशिवरात्री उत्सव विशेष – रुद्रपूजा आर्ट ऑफ लिव्हिंग – वैदिक धर्म संस्थान द्वारे आयोजितसुमारे ३५० पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतला!

0
4

पुणे, पिंपरी चिंचवड मधून आलेल्या सर्व भाविकांनी ह्या वेळी रुद्रम् मंत्राच्या सानिध्यात शिव तत्त्व व गहन ध्यानाचा अनुभव घेतला.

समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी, नैराश्य घालवून सकारात्मक ऊर्जा प्रस्तापित करणाऱ्या साठी ह्या महाशिवरात्रि विशेष रुद्रपुजा चे आयोजन केले गेले.

आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम वरून आलेले कर्ता अमोल येवले जी आणि वेद पंडित सोहम व राजकमल यांच्या सानिध्यात ही रुद्रपूजा व सत्संग झाला.

आर्ट ऑफ लिव्हिंग पिंपळे सौदागर, वाकड संघ आणि संत तुकाराम नगर केंद्र तर्फे ह्या सामुहिक रुद्रपूजा चे आयोजन केले गेले.

राकेश चव्हाण चे सत्संग संघ ने ही शिवमय सत्संग भजनां ने सर्वाना मंत्रमुग्ध केले.
वैदिक धर्म संस्थान स्थानिक समन्वयक डॉ. मृणाल देशपांडे जी, पिंपळे सौदागर, वाकड आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक व स्वयंसेवक संघ दर महिना सातत्यपूर्ण मासिक रुद्रपूजा आयोजित करत आहेत, या महाशिवरात्रीने वर्षाची ११ वी रुद्रपूजा साकारली – एक उल्लेखनीय कामगिरी!
आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर चे प्रशिक्षक सचिन नाईक व येथील केंद्र चे सर्व प्रकारचे सहायक, स्वयंसेवकांचे आणि विशेषतः या कार्यक्रमाला भव्य यशस्वी करण्यासाठी मनापासून योगदान देणाऱ्या उत्साही लहान चिमुकले मुलांचे स्वयंसेवकांचे ही विशेष आभार.

वैदिक धर्म संस्थान चे राज्य समन्वयक श्रेयांश चौधरी आणि निपा जानी हे वर्ष भर नव नविन पूजा शास्त्रोक्त वैदिक पद्धतिने पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये करत आहेत. तसेच जन्मदिनी आयुष हवन चे ही आयोजन केले जात आहे, येणार्‍या चैत्र नवरात्रि उत्सव साठी ही पुणे त्रिवेणी आश्रम मध्ये सर्वाना आमंत्रित केले जात आहे.