महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

0
660

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महाविद्यालयीन तरुणीचा कार मधील तीन जणांनी विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मैत्रीण कॉलेज सुटल्यानंतर रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी इनोव्हा कार (एम एच 12 / जे यु 6222) मांडून तिघेजण आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीचा कारमधून वारंवार पाठलाग केला. फिर्यादींसोबत अश्लील वर्तन करून धक्काबुक्की व शिवीगाळ करून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.