महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग आणि विनयभंग

0
597

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग केला. तिला वारंवार फोन करून प्रेमाची मागणी केली. तरुणीला आणि तिच्या आईला बघून घेण्याची तसेच स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची आरोपीने धमकी दिली. ही घटना सन 2019 ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली.

अजिंक्य विजय उपाडे (रा. शांतीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा एकतर्फी प्रेमातून घरापासून महाविद्यालयापर्यंत पाठलाग करत असे. फोनवरून बोलून तो फिर्यादीस सतत त्रास देत. 17 सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या आई त्यांना घेऊन परिक्षेसाठी गेल्या. पेपर सुटल्यानंतर त्या आईसोबत घरी जात असताना आरोपीने फिर्यादी यांचा हात पकडून त्यांच्याकडे प्रेमाची मागणी करत त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीला आणि त्यांच्या आईला बघून घेण्याची धमकी देत स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.