महाविद्यालयाचे नाव खराब होईल म्हणून पिडीत तरुणीला कॉलेजमधून काढले

0
120

पुणे, दि. २७ (पीसीबी) – महिलांवरील अत्याचारांच्या सततच्या घटनेने राज्य हादरले असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून अशीच एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांकडून या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन तरुण अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांवरील अत्याचारांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या प्रकरणावरुन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे.

विद्येच्या माहेरघरात पुन्हा तोच प्रकार, विरोधक आक्रमक
पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटनांची मालिका सुरुच असतानाच पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीवर त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची अशीच एक घटना ताजी असताना, आज परत एक अशीच घटना समोर आली आहे. दरम्यान, शिक्षणाच्या माहेर घरात हा प्रकार घडल्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज पुणे पोलीस आयुक्तालयात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची