महावितरणमध्ये अधीक्षक अभियंतापदी अरविंद बुलबुले, युवराज जरग रूजू

0
218

पुणे, दि. २२ (पीसीबी) : पुणे परिमंडलमध्ये रास्तापेठ शहर मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. अरविंद बुलबुले तर पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. युवराज जरग यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.

रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. बुलबुले हे नोव्हेंबर १९९९ पासून महावितरणमध्ये कार्यरत आहेत. येथे रूजू होण्यापूर्वी ते ठाणे शहर मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्याची रास्तापेठ शहर मंडलमध्ये प्रशासकीय बदली झाली आहे. तर पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. जरग हे जुलै १९९९ पासून महावितरणमध्ये कार्यरत आहेत. येथे त्यांची पदोन्नतीवर बदली झाली असून यापूर्वी ते पालघर मंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते.