महावितरणच्या विद्युत सहायकास मारहाण; तिघांना अटक

0
361

चाकण, दि. २७ (पीसीबी) – वीज पुरवठा तोडल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून महावितरणच्या विद्युत सहायकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी साडे अकरा वाजता आंबेठाण रोड, चाकण येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

मयूर चंद्रकांत चौधरी (वय 23, रा. चाकण) यांनी याप्रकार्निचाकन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय पन्नालाल चोरडिया, आकाश पन्नालाल चोरडिया, पन्नालाल शंकरलाल चोरडिया (सर्व रा. चाकण) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी हे महावितरणच्या चाकण शहर शाखेत विद्युत सहायक पदावर काम करतात. त्यांनी अक्षय चोरडिया याचा विद्युत पुरवठा तोडला होता त्या कारणावरून अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी चौधरी यांना अडवून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गाडीची चावी काढून घेत त्यांना जाण्यापासून अटकाव करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.