महाविकास आघाडी ४० ते ४५ जागांवर विजय मिळवेल

0
252

मुंबई,दि.१७(पीसीबी) – भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुका सोप्या जाण्यासाठी शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावला असला तरी मतदार मात्र, फुटीरांसोबत येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांकडून सर्व्हे सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असल्याचे एका सर्वेमध्ये दिसतं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात नवचैतन्य पसरले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट (शिवसेना), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी ४० ते ४५ जागांवर विजय मिळवेल,असा निष्कर्ष सर्वेमधून पुढे आले आहेत. दुसरीकडे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट फोडून नुकतेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक मतदारसंघात जाऊन ४८ जागांवरील ग्राऊंड रिअ‍ॅलिटी, काँग्रेसकडून एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा दावा एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

शिंदे-फडणवीस-पवार हे तिघे एकत्र येऊनही आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा विजय मिळवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा दावा एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

राज्यातील या सर्वेक्षणातून आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आला आहे.या सर्वेक्षणाविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, हा सर्व्हे करताना ४८ मतदारसंघात जाऊन तेथील सद्य राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी सुरु केली असल्याचे प्रसारमाध्यमाशी बोलताना नाना पटोले यांनी स्पष्ट केले.