महाविकास आघाडी म्हणूनच पुढील निवडणुकाही लढू – जयंत पाटील

0
180

मुंबई, दि.२ (पीसीबी) – “महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे,” असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, “पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. तसेच स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथे-जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु.”

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीबाबत जयंत पाटलांनी भाष्य केलंय. आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना राहणार की स्वतंत्ररित्या वाटचाल करणार, याबाबत अनेकांना उत्सुकता होती.