महाविकास आघाडीत बिघाडी शंकर जगतापांना आम्ही लाखाच्या मताधिक्याने आमदार बनविणार – मोरेश्वर भोंडवे

0
46

मोरेश्वर भोंडवेंचा इरादा पक्का; जगतापांच्या नेतृत्वावर शिक्का

महाराष्ट्रात नंबर एकच्या विक्रमी मताधिक्याने जगताप आमदार होतील; मोरेश्वर भोंडवे यांचा विश्वास

चिंचवड, दि. ११ -निवडणुकीआधीच अवसान गळालेल्या ठाकरे-पवारांच्या नेतृत्त्वात मविआला जबरदस्त धक्का बसला असून, विरोधी उमेदवाराचे कंबरडेच मोडल्यात जमा आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले आणि ‘बेरजेचे’च्या राजकारणासाठी माहीर असलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आता मविआतून ‘वजा’ झाल्याने या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी मोरेश्वर भोंडवे हे मतांचा ‘गुणाकार’ करणार हे नक्की. भोंडवे यांच्या खेळीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. थोडक्यात, याचा राजकीय फायदा उठवत मोरेश्वर भोंडवेंनी आता शंकर जगतापांना एक लाखाच्या ‘लीड’ने विधानसभेत पाठविण्याचा चंग बांधला आहे. परिणामी, चिंचवड मतदारसंघात जगताप-भोंडवे यांच्यातील दिलजमाईमुळे महाविकास आघाडीच्या बड्या-बड्या नेत्यांची झोप उडणार आहे.

चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा विजयी रथ रोखण्याच्या हेतूने अनेक खेळ्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून भागातील बडे राजकीय नेते गळाला लावण्याच्या खेळ्या खेळल्या गेल्या. मात्र, त्यातून आघाडीचा हेतू आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारांचे कारनामे हळूहळू उघड होताच, आघाडीतील बहुतांश नेते आता महायुतीचे नेते शंकर जगतापांच्या विजयावर मोहोर उमटवत आहेत.

चिंचवडच्या भल्यासाठी जगताप हेच हुकमी एक्का असू शकतात असा विश्वास महायुतीपलीकडे जाऊन आघाडीतील नेत्यांनाही वाटू लागला आहे. त्यामुळे निवडणूक ऐन रंगात असतानाच महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या गोटात मात्र आता दिवसागणिक निव्वळ लीडमध्ये हजारो मतांची भर पडणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मीदेखील तयारी केली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने मी या निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु माघार घेतली तरी चिंचवड विधानसभेच्या विकासाचा मुद्दा हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आणि यासाठी मला सक्षम पर्याय म्हणून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच योग्य वाटले. त्यामुळे माझ्या सर्व सहकारी मित्रांशी यासंदर्भात चर्चा करून आणि रावेतमधील जनतेचा कौल घेऊन मी शंकर जगताप यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत जगताप यांना किमान एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी ‘कमळ’ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन, मी रावेत आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनतेला करतो, असे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे म्हणले.

आमचे सहकारी मित्र मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भोंडवे यांच्याकडेही विकासाची दूरदृष्टी आहे. रावेत गावच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्यामुळे निश्चितच आमची ताकद द्विगुणीत झाली असून आमच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास दुणावला आहे. आगामी काळात आम्ही खांद्याला खांदा लावून चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असून त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य कायम आमच्यासोबत असेल. तसेच रावेतच्या जनतेनेही जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आहे त्या विश्वासाला नक्कीच पात्र होण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, असे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सांगितले.