दि ४ जुलै (पीसीबी ) – आळंदी : इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विरोधात पारी चिंचवड शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आज इंद्रायणी नदीकाठी इंद्रायणी बचाव एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाफीचे वतीने भाजप हटाव, इंद्रायणी बचाव च्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. ‘सत्ताधारी भाजप व महायुती सरकारच्या निष्क्रिय भ्रष्ट कारभारामुळे पवित्र इंद्रायणी नदी आज प्रचंड प्रदूषित झाली असून मरणासन्न अवस्थेत आहे, नमामी इंद्रायणी च्या नावाखाली जनतेची दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आजवर पवित्र इंद्रायणीच्या नावाखाली केवळ भ्रष्ट कारभार केला आहे, पण यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही अशी भावना उपस्थित आंदोलक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत इंद्रायणी नदीला पुनरुज्जीवीत करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा येत्या काळात जनआंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा सर्वच महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आंदोलनसमयी मा. नगरसेविका सुलभाताई उबाळे, सुलक्षणताई शिलवंत धर, मा. नगरसेवक गणेश भोंडवे, विनायक रणसुभे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, तुषार सहाणे, कुणाल तापकीर, विशाल चव्हाण, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष दिलीप पानसरे, वंदनाताई आराख, मनीषाताई शेळके, पंचशीला कांबळे, हेमंत बलकवडे, माणिकराव चव्हाण, सुनील कस्पटे, राजेंद्र कदम, संपत पानसरे, राजू खंडागळे, योगेश सोनवणे, माऊली बोऱ्हाडे, गणेश काळे, गणेश ताजने, अनिल तापकीर, मनीषा पवार, राहुल पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.