महाविकास आघाडीच्या नागपूरातील वज्रमूठ सभेला अजित पवार नसणार, कारण…

0
184

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा उद्या नागपूर येथे होत आहे. या सभेला ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र अजित पवारांच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे नुकतीच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरे यांना वेगळं आसन देण्यात आलेलं होतं. शिवाय सभा सुरु झाल्यानंतर त्यांची सभास्थळी उपस्थिती झाली होती. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दांडी मारली होती. त्यानंतर दुसरी सभा आता नागपूर येते होत आहे.

नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित राहणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ने यासंदर्भातील वृत्त दिले असून त्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहतील, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. दर संजय राऊत यांनीदेखील ते उपस्थित राहतील, अशी प्रतिक्रिया दिलीय. दुसरीकडे अजित पवारांऐवजी अनिल देशमुख हे नागपूरच्या सभेला उपस्थित राहतील, असं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे नेते नागपूच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. जयंत पाटील हेदेखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात असतांना अजित पवारांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण केली जातेय. मागच्या तीन-चार दिवसांपासून अजित पवांरांचं मौन असल्यानं ते जातील की नाही? याबाबत कुणीहीह ठामपणे काहीही सांगत नाहीये.