महाविकास आघाडीच्या तिनही उमेदवारांना विजयी करण्याचे आझम पानसरे यांचे आवाहन

0
56

चिंचवड १८ : औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड शहाराची पायाभरणी करणारे ८४ वर्षीय योद्धे शरद पवारांना यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच सर्व सामान्यांच्या हिताचे महाविकास आघाडी सरकार बहुमताने येण्यासाठी आघाडीच्या तिनही उमेदवारांना
विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी सोमवारी (ता. १८) शहरातील मुस्लिम बाांधवांना केले.


पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने चिंचवड-काळभोरनगर येथील सिझन बॅन्क्वेट हॉलमध्ये शहरातील मुस्लिम बांधवांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन पानसरे संवाद साधताना बोलत होते. यावेळी शहरातील मौलाना, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात महाविकास आघाडीचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे, भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे, पिंपरीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.


पानसरे यांच्या हस्ते भव्य मोठा गुलाब फुलांचा हार तीनही उमेदवारांना एकत्रित घालून विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड क्षेत्रात सुमारे ३ लाखाहून अधिक मुस्लिम समाज बांधव मतदार स्थायिक झाले आहेत असे सांगत त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या सांगितल्या. सांस्कृतिक भवन, उर्दू शाळा व कॉलेजची निर्मिती, दफनभूमीसाठी जागा, राजकीय सत्तेत वाटा, मस्जिद मदरसे बांधणी आदी प्रमुख मागण्या उपस्थितांनी
वाचल्या. त्यास उपस्थितांनी एकमुखी मंजूरी दिल्यानंतर तसे निवेदन तीनही उमेदवारांना देण्यात आले.
मागण्यांना उत्तर देताना कलाटे, गव्हाणे व शिलवंत-धर या उमेदवरांनी आमदार झाल्यावर सर्व प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. ज्येष्ठ नेते पानसरे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना तीनही उमेदवारांना प्रचंड बहूमताने निवडूण आणण्याच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. रमजान अत्तार, इम्रान बिजापूर, आरिफ शेख, झिशान सय्यद, मोहम्मद अली सय्यद, साहिद सय्यद, तौफिक तांबोळी, अन्वर उर्फ पापा सय्यद, असिफ सय्यद, मुन्ना शेख आदींनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. मौलाना अब्दुल गफुर, गुलामअली भालदार यांनी सूत्रसंचालन केले.