महाळुंगे मधील कंपनीतून 14 लाखांचे पार्ट चोरीला

0
350

चाकण, दि. ३० (पीसीबी) – महाळुंगे परिसरातील बी एम डी इंजिनिअरिंग या कंपनीतून चोरट्यांनी 14 लाख चार हजार 500 रुपयांचे जॉब पार्ट चोरून नेले. ही घटना 20 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

गोकुळ ज्ञानेश्वर भिसे (वय 29, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची महाळुंगे येथे कंपनी आहे. सोमवारी (दि. 19) रात्री पावणे नऊ ते मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेआठ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागील बाजूला असलेल्या उघड्या पत्र्याच्या शेडमधून 14 लाख चार हजार 500 रुपये किमतीचे 107 जॉब पार्ट चोरून नेले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.