महाळुंगेमध्ये दोन मोबाईल हिसकावले

0
308

चाकण, दि. १६ (पीसीबी) – रस्त्याने पायी जात असलेल्या दोन तरुणांचे मोबाईल फोन चोरट्यांनी हिसकावून नेले. या दोन्ही घटना महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत खालूंब्रे आणि सावरदरी येथे घडल्या.

रविशंकर मोतीलाल मौर्य (वय 26, रा. खालूंब्रे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमएच 14/एचबी 8792 दुचाकीवरून आलेल्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी खालूंब्रे येथील के एस एच कंपनीसमोरून जात असताना दुचाकीवरून दोन चोरटे आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या शर्टाच्या खिशातून दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

कार्तिक किशनराव पुंड (वय 20, रा. सावरदरी, ता. खेड. मूळ रा. परभणी) यांनी दोन चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सावरदरी गाव ते एअरनिक्विड कंपनीकडे जाणा-या रस्त्याने पायी चालत कामावर जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेली दोन चोरट्यांनी पुंड यांच्या शर्टाच्या खिशातून 33 हजार 42 रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून नेला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.