महालक्ष्मी मरीआई माता मंदिर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने संदीप वाघेरे यांच्या वतीने मखर अर्पण

0
76

पिंपरी – उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने, पिंपरी गावाचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मरीआई माता मंदिर येथे एक आकर्षक मखर उभारण्यात आले आहे.
हे मखर पिंपरीचे नगरसेवक मा. संदीप वाघेरे यांच्या वतीने, कै. नाथूभाऊ उर्फ रघुनाथ दिनाजी वाघेरे यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ अर्पण करण्यात आले आहे.

या मखराची रचना पारंपरिक सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा संगम साधणारी असून, भक्तांना एक अनोखा भक्तिपूर्ण अनुभव देणारी आहे. नवरात्र उत्सवात दररोज महाआरती, भजन-कीर्तन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती वाघेरे यांनी दिली

सर्व भाविक भक्तांनी यामध्ये उपस्थित राहून महालक्ष्मी मरीआईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.