महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी आता १४ फेब्रुवारीला ?

0
344

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणीत आता १४ फेब्रुवारीला होणार आहे.

संजय राऊत म्हणाले, आमचे घटनेवर प्रेम आहे. घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. आज मुख्य न्यायाधिशांनी सांगितले की १४ फेब्रुवारी पासून आम्ही हे मॅटर सलग सुनावणी घेऊ. आता त्या सुनावणीत निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे असल्याने सर्व काही प्रेमाणे होईल.

आज मंगळवार, दि. १० जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी होती. या सुनावणीकडे राज्यासहीत देशाचे लक्ष लागले होते. सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी आहे. या सत्तासंघर्षाची सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे, आता पुन्हा महिनाभराची पुढची तारिख मिळाली आहे.