वृक्षमीत्र, समाजसेवक श्री अरूण पवार यानां दि.२९ शनीवार रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथील संवाद व्यासपीठ हरिशजी मोरे आणि मित्र परिवाराच्या वतीने संसंद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारने याच्यां शुभहस्ते हस्ते कार्य-कर्तृत्व पुरस्कारा देऊन सन्मानित करण्यात आले.वृक्षमीत्र श्री अरुण पवार यांनी मराठवाडा जनविकास संघाची स्थापन करून. संन.२०१२पासून लाखो वृक्षाची लागवड केली आहे. भंडारा डोंगर, देहूगाव मरकळ , शिंदेवाडी , पिंपळे गुरव , नवी सांगवी अशा अनेक भागांमध्ये वृक्षारोपण करून संगोपन करतात आजही ते त्या वृक्षाचे संगोपन करतात.
तसेच विविध उपक्रमात लाखो वृक्षाचें दान केली आहेत. धारूर ते तुळजापूर बायपास पर्यंत. धारूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्या पर्यंत हजारो वृक्षांची लागवड केली आहे. तसेच देहु-आळंदी येथील भंडारा डोगरावरही हजारो वृक्षारोपण करून संगोपन करणे चालू आहे. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गोरगरीब, मजदूर, अपंग, विद्यार्थी, शेतकरी,गो-शाळा, रानावनातील मुके प्राणी,देहु-आळंदीहून पंढरपूर कडे निघालेल्या पालख्यानां,संतानां, समाजसेवक, राजकारणी, तसेच समाजातील वंचित व ऐकदम खालच्या पातळीवरील काम करणाऱ्यांना आर्थिक मदत,बहुमोल साथ,मार्गदर्शन ते सदैव करत असतात.
याच कार्याची दखल घेऊन धारूर येथील ग्रामस्थांनी बंधु बालाजी काका पवार यानां बहुमतानी सरपंच पद देऊन विकासासाठी संपूर्ण ग्रामपंचायत ताब्यात दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, धारूर रत्न पुरस्कार,समाजभूषण पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मीळाले आहेत. .आश्या थोर समाज सेवकाला पुणे-पिंपरी चिंचवड येथील संवाद व्यासपीठाचा कार्य-कर्तृत्व पुरस्कार खासदार संसद रत्न श्रीरंग बारने याच्यां हस्ते मीळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.