महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर….

0
10

दि.०८(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून सदर सार्वजनिक सुट्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात लागू राहणार आहे.

सदर सार्वजनिक सुट्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना लागू राहील. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. तरी १५ जानेवारी २०२६ या सुट्टीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.