दि.21 (पीसीबी) – सुप्रसिद्ध निवेदक तथा मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन तर नाशिकच्या सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. सुमतीताई पवार संमेलनाच्या असणारा अध्यक्ष तर प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ असणार स्वागताध्यक्ष
या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे आदिशक्ती संत मुक्ताई कडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांना ७५० व्या जयंती वर्षानिमित्त ७५० फूट लांब ( १०१ किलो वजनाची जगातील सर्वात वजनदार ) राखी बांधून या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे याची नोंद ग्रीनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येईल या ऐतिहासिक संमेलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती
शिवचरण उज्जैनकर, फाउंडेशन मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव आणि महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या सौजन्याने आयोजित तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य हे संमेलन ४ जानेवारी २०२५ वार शनिवार रोजी मोरया मंगल कार्यालय, प्युअर हॉटेल शेजारी नवीन पुलाजवळ आळंदी देवाची जिल्हा पुणे येथे नियोजित केलेले आहे दिनांक ८ डिसेंबर २०२४ वार रविवारला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांची मीटिंग श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष तथा या संमेलनाचे संयोजक प्रकाश काळे साहेब आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव संमेलनाचे सहसंयोजक अजित वडगावकर आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सन्माननीय खजिनदार तथा या संमेलनाचे सह निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर पाटील साहेब यांच्या उपस्थितीत नुकतीच मिटिंग संपन्न झाली सन्माननीय पदाधिकारी, महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक रसिकांनी यांनी नोंद घ्यावी असे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे या सभेला श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहाय्यक शिक्षक विकास शिवले शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ.अजयकुमार लोळगे उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सल्लागार रामचंद्र कुऱ्हाडे तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष एमआयटी ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ या संमेलनाच्या निमंत्रक तथा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ. रूपालीताई चिंचोलीकर तर ओळख ज्ञानेश्वरी या परिसंवादाचे अध्यक्ष श्री प्रकाश काळे आळंदी ताटी उघडा ज्ञानेश्वरा या दुसऱ्या परिसराचे अध्यक्ष फाउंडेशनच्या राज्य उपाध्यक्ष हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील प्रा. मनिषा रिठे यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे चाळीसगाव जिल्हा बुलढाणा येथील चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी डॉ. वीरा राठोड यांची प्रकट मुलाखत फाउंडेशनचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. डॉ.सुनील धनगर हे घेणार आहेत त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक बोलीभाषेतील अभंग गीत यांचा समावेश आहे तर कवी संमेलनाचे अध्यक्ष फाउंडेशनचे राज्य सल्लागार कळवा जिल्हा ठाणे येथील सतीश सोळांकुरकर तसेच ३१ मान्यवरांना वेगळेवेगळा सत्रांमध्ये तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कारांनी मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. या प्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वरदास मते उज्जैनकर फाउंडेशनचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन मदनकर फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव रामचंद्र गुरव फाउंडेशनचे आजीव सभासद तथा उज्जैनकर सर यांचे चि. श्री अरविंद उज्जैनकर आदी सन्माननीय पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. संमेलनाला साहित्यिक रसिकांनी त्याचप्रमाणे फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित ठेवून या इतिहासिक साहित्य संमेलनात सहभाग नोंदवावा असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी आवाहन केले आहे.