महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची सभा उत्साहात संपन्न

0
232

आळंदी , दि. २७ (पीसीबी): महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची सभा श्रीक्षेत्र आळंदी येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यत्वेकरून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन आळंदी येथे दिनांक २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्याचे ठरले. कार्यकारी मंडळाची सभा व नियामक मंडळाची १९ फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी ७ वाजता घेण्याचे ठरले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे, पुणे विभागाचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे विभागाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, सहकार्यवाह राजेंद्र ढमाले पुणे, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, नागपूर विभागाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हभप. मोहन महाराज शिंदे, उपाध्यक्ष हनुमंत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोहन महाराज शिंदे यांनी अधिवेशनाच्या नियोजन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. आलेल्या मान्यवरांचे ज्ञानेश्वरी ग्रंथ व प्रसाद भेट देऊन स्वागत करण्यात आले.

पुणे विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष अरुण दांगट,
मधुकर सुतार, पांडुरंग सुर्यवंशी, दिलीप कोरे, प्रकाश पाटील, हनुमंत देवकर, भिमराव पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी संजय बोंदाडे, विलास चोंधे, राजगोंडा पाटील, संतोष गोफणे तसेच राज्य कार्यकारीणी संचालक मंडळ, पुणे विभाग व पुणे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोपानराव पवार यांनी प्रास्ताविक केले, तर विजय कोलते यांनी आभार मानले.