महाराष्ट्र माथाडी श्रमजीवी कामगार युनियनच्या अध्यक्षपदी सुरज बाबर

0
447

पिंपरी दि. १५ (पीसीबी) – महाराष्ट्र माथाडी श्रमजीवी कामगार जनरल युनियनच्या राज्याच्या अध्यक्षपदी सुरज बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मावळचे माजी खासदार दिवंगत गजानन बाबर यांचे सुरज हे चिरंजीव आहेत. 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत सुरज यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र युनियनचे जनरल सेक्रेटरी तानाजी कदम यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

ज्या कामगारांना न्याय मिळत नाही. पिडीत कामगार, असुरक्षित असणारे कामगार तसेच कोणत्याही आस्थापनेमध्ये अनोंदीत कामगार असतील. त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम बाबर पाहतील. महाराष्ट्र शासन आस्थापीत राज्यात 36 माथाडी मंडळे आहेत. त्या-त्या जिल्ह्यामधील माथाडी मंडळामध्ये अनोंदीत आस्थापना नोंदीत करणे, आस्थापने मधील अनोंदीत कामगार माथाडी स्वरुपाची कामे करीत असतील. त्या कामगारांची माथाडी मंडळात नोंदणी करणे. अनोंदीत आस्थापनांना भेट देवून त्यांना नोंदीत होण्याच्या सूचना देण्याचे अधिकार युनियनमार्फत बाबर यांना देण्यात आले आहेत.

अनोंदीत आस्थपनांची, अनोंदीत कामगारांची माहिती माथाडी मंडळात देणे, त्या आस्थापनांना, कामगारांना माथाडी मंडळात नोंदणी करणे, नोंदीत कामगारांचे वाद माथाडी मंडळात मिटविणे. याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील 36 माथाडी मंडळामध्ये नोंदीत, अनोंदीत कामगारांची प्रकरणे माथाडी मंडळामध्ये चालविण्याचे काम बाबर पाहतील. युनियनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून बाबर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. 1 ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2023 या 15 महिन्याच्या कालावधीसाठी त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.