महाराष्ट्र धर्मासाठी विचारांचा मेळावा

0
3

संभाजी ब्रिगेड आयोजित कार्यक्रमात प्रविण गायकवाड यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन

पिंपरी, (पीसीबी) दि. २० : जे का रंजले गांजले, त्यासी म्हणेजो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज याच्यासह महाराष्ट्रातील सर्वच संतांनी समानतेची माणुसकीची शिकवण दिली.

जगाच्या कल्याणा संतांचे विभूती या उक्तीप्रमाणे समाज निर्मितीसाठी संदेश दिला याचे पालन छत्रपती शिवाजीमहाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहूमहाराज डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतून केले. सर्व धर्म समानता हा संदेश दिला या महामानवांनी सांगितलेल्या आणि आचरणात आणलेल्या महाराष्ट्र धर्माची आज समाजाला खरी गरज आहे.याची माहिती समाजाला व्हावी समाजाचे प्रबोधन व्हावे संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज,शिवराय, शाहू,फुले,आंबेडकर,संत गाडगेमहाराज,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेला धर्म जागृत राहावा या हेतूने महाराष्ट्र धर्मासाठी…..या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे कार्यक्रमाची सुरवात सुप्रसिद्ध शाहीर सुरेश सुर्यवंशी यांच्या शाहीरीने होणार आहे या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, सुप्रसिद्ध अभिनेते विचारवंत किरण माने, समाज प्रबोधनकार हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे मान्यवर महाराष्ट्र धर्मासाठी या विषयी विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड सह शहरातील विविध शिव प्रेमी संविधान प्रेमी संघटनांच्या वतीने केले आहे या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.