महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदासाठी खासदार रामदास तडस…

0
533

नागपूर, दि. २२ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. महाराष्ट्रात सत्तापालट झाली. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असं शिंदे गट आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या हलचालींकडे बघितलं जातंय. राजकीय दृष्टीकोणातून यासगळ्यांकडे बघितली जातंय. आता याच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस मैदानात आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी खासदार तडस आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. कधीकाळी शरद पवार यांचं प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचा हा पहिला प्रयत्न आहे, अशीही चर्चा रंगलीय आहे.

भाजप खासदार बृजभुषण सिंग हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत. बृजभुषण सिंग यांनी अध्यक्षांच्या बरखास्तीची कारवाई त्यावेळी केली होती. त्यामुळे तो शरद पवार यांना धक्का दिल्याचं बोललं जात होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष त्यावेळी होते तर बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव. यावरुन वेगळीच चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.

रामदास तडस यांचा परिचय
2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबीयानं भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधान परिषदेवर दोनवेळा आमदार, देवळाली नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेत खासदार अशी तडस यांची राजकिय कारकिर्द आहे.