महाराष्ट्रात राजकीय भूकंपानन्तर दिल्लीतही राजकीय भूकंपाची शक्यता

0
325

नवी दिल्लीदि. २५(पीसीबी) : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता दिल्लीत ही राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आम आदमी पक्षाचे काही आमदार नॉटरिचेबल असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. ज्यामध्ये जवळपास 53 आमदार पोहोचल्याची माहिती आहे. तर आमदार हे नॉटरिचेबल असल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीत दारू धोरणावरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीनंतर सीएम केजरीवाल आपल्या सर्व आमदारांसह राजघाटावर पोहोचले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. आम आदमी पक्षाच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप देखील केजरीवाल यांनी केला आहे.

दुसरीकडे सर्व आमदारांशी संपर्क झाल्याचं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे 53 आमदार बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. आठ आमदार हे दिल्लीबाहेर आहेत. त्यापैकी सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत, मनीष सिसोदिया हिमाचल प्रदेशच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. सभापती राम निवास गोयल अमेरिकेत आहेत.

‘आप’च्या चार आमदारांनी बुधवारी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, भाजपने त्यांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ते म्हणाले की, मला सांगण्यात आले आहे की, जर ते भाजपमध्ये सामील झाले नाहीत तर मनीष सिसोदिया यांच्याप्रमाणेच त्यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडीचे खोटे गुन्हे दाखल केले जातील. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, आपचे आमदार अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार यांना भाजप नेत्यांनी संपर्क साधला आहे.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, पक्षाच्या सुत्रांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व आपल्या काही आमदारांशी संपर्क करू शकलेला नाही. भाजपने आपले आमदार फोडले तर नाहीत, अशी भीती त्यांना आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या (पीएसी) बैठकीत आमदारांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे एकूण 62 आमदार आहेत. पण 7 आमदार नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात आहे.