पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – संपूर्ण देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये जनतेच्या कल्याणकारी योजना,चांगले रस्ते,शासकीय आरोग्य सुविधा,गोरगरिबांची घरे ईई विविध कामासाठी पैसे नसतात.मात्र निवडणुका आल्यावर त्या जिंकण्यासाठी याच प्रस्थापित सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष करोडो रुपये घेऊन आपल्या वस्तीमध्ये मतदान विकत घेण्यासाठी येतात,मात्र आपल्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी पैसे नसतात.50 कोटी घेऊन महाराष्ट्रात सत्तांतर होते,जनतेने निवडून दिलेली राज्यसरकारे पैशाच्या जोरावर पडली जात आहेत.
शिवरायांच्या स्वप्नातील रयतेचा विचार महाराष्ट्रात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पार्टीची स्वराज यात्रा जनताभिमुख कार्यक्रम देऊन विधानसभा,महापालिका निवडणुकीत उतरणार आहे.कारण हा आम आदमी चा राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला आहे.असे मनोगत ‘आप’चे राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी आकुर्डी येथील जाहीर सभेत मांडले. आप युवा नेते संदीप देसाई यांनी म्हटले की,आम आदमी पार्टी लाईट, पाणी, चांगला शाळा शिक्षण फ्री देते. परंतु हे फ्री नसुन जनतेच्या करातून जमा पैसा आहे भ्रष्टाचार न करता जनतेसाठी वापरला जातो. महाराष्ट्रातही अशा सुविधा आम आदमी पार्टी सत्ता आल्यानंतर देणार आहे.
गरिबी दूर करण्यासाठी मोफत शिक्षण सरकारने दिले पाहिजे,तुमची मुले शिकली तर गरिबी दूर होईल.दिल्लीमध्ये खाजगी शाळा ओस पडल्या आहेत,कारण आमचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळांची दर्जा सुधारून मोफत शैक्षणिक सुविधा दिल्या आहेत.नवीन इमारती बांधून सुसज्ज क्लास रूम तसेच जनआरोग्यासाठी सरकारी सर्वोपचार रुग्णालये व मोहल्ला क्लिनिक सक्षम केली,आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा राजकीय मसुदा पिंपरी चिंचवड शहरासाठी जाहीर करून मनपा निवडणुकीमध्ये सामान्य,सुशिक्षित उमेदवारांना जनतेचे खरे प्रतिनिधी म्हणून उभे करणार आहोत–मुकुंद किर्दत यावेळी आमचे नेते विजय कुंभार, धनंजय शिंदे, धनराज वंजारी, संदीप देसाई ,चेतन बेंद्रे,सिताताई केंद्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
चिखली जाधववाडी मध्ये स्वराज यात्रेचे जोरदार स्वागत
‘आप’च्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सीता ताई केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली मोशी,जाधववाडी,प्राधिकरण येथील रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला या रॅलीचे नियोजन प्रकाश हगवणे, वैजनाथ शिरसाट,माया सांगवे, रविराज काळे,ऋषिकेश कानोटे,सूर्यकांत सरोदे यांनी केले
आकुर्डी येथील सभेचे प्रास्ताविक राज चाकणे यांनी केले. ‘आप’चे शहर कार्यकारी चेतन बेंद्रे,संतोष इंगळे,अमर डोंगरे,स्मिता पवार,संदीप देसाई,संदीप सोनवणे,अमर डोंगरे,देवेन्द्र वानखेडे, स्वप्निल जेवळे आदी मान्यवरांनी स्वराज यात्रेचे व जाहीर सभेचे संयोजन केले.










































