महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी तर नंदूरबारमध्ये सर्वात जास्त मतदान

0
157

दि १३ मे (पीसीबी ) – लोकसभा निवडणुकित चौथ्या टप्प्यात देशात होणाऱ्या मतदानात विशेष उत्साहाचा माहोल आहे. देशात ९६ जागांसाठी मतदान सुरू असून दुपारी ३ पर्यंत ते ५२.६० टक्के होते, तर महाराष्ट्रात ते अवघे ४२.३५टक्के झाले असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

दुपारी ३ पर्यंत आंध्र प्रदेशात ५५.४९ टक्के, बिहार – ४५.२३ टक्के, जम्मू काश्मीर -२९.९३ टक्के, झारखंड ५६.४२ टक्के, महाराष्ट्र -४२.३५ टक्के, ओडिसा – ५२.९१ टक्के, उत्तर प्रदेश -४८.२१ टक्के आणि प. बंगाल – ६६.०५ टक्के झाले होते.

महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात हेच प्रमाण पुढील प्रमाणे आहे.
नंदुरबार – ४९.९१
जळगाव- ४२.१५
रावेर – ४५.२६
जालना – ४७.५१
संभाजी नगर – ४३.७६
मावळ -३६.५४
पुणे – ३५.६१
शिरूर- ३६.४३
नगर- ४१.३५
शिर्डी -४४.८७
बीड – ४६.४९