महाराष्ट्रातही हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती होणार – शंकर जगताप

0
133

चिंचवड, दि. 09 (पीसीबी) : हरियाणा विधानसभा निवडणुकीत सर्व आघाडीच्या माध्यमांचा एक्झिट पोल खोटा ठरवत हरियाणाच्या सूज्ञ जनतेने कोणत्याही भूलथापा, खोटी आश्वासने व अपप्रचार यांना बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ; सबका विकास’ या संकल्पनेला साथ देत हरियाणामध्ये तिसऱ्यांदा कमळ फुलवत ‘हॅटट्रिक’ची किमया साधली. त्याबद्दल सर्वप्रथम हरियाणातील सर्व मतदार बंधू-भगिनींचे आभार. लवकरच महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार असून हरियाणातील या विजयामुळे राज्यातील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे, अशी प्रतिक्रया पिंपरी चिंचवड भाजपा अध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

हरियाणा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती साधण्यासाठी आम्हीही उत्सुक असून पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.