आळंदी,दि.११(पीसीबी) – आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी स्थानावरून वाहणाऱ्या महाराष्ट्राची लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र इंद्राणी नदीत पिंपरी चिंचवड हद्दीतील व आळंदी परिसरातील आस्थापनांनी रसायनिक्त प्रक्रिया न केलेली पाणी सोडल्यामुळे संपूर्ण इंद्रायणी फेसाळलेल्या अवस्थेत वाहताना बघून आळंदीकर नागरिक व इंद्राणी नदीकाठच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे याला जबाबदार पिंपरी चिंचवड मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळच आहे. शिवाय गुरुवारी कार्तिकी एकादशी जवळ आली आहे, त्यावेळी लाखो भाविक याठिकाणी स्नान करतील, शिवाय आलेल्या जागतिक अहवाला नुसार जगात वायू प्रदूषणात दिल्ली शहराचा पहिला क्रमांक लागतो, तेथील प्रशासनाने शाळांना काही दिवस सुट्टी देऊन, वाहतूक व्यवस्था सम व विषय तारीखेस केली आहे याचा बोध महाराष्ट्र शासनाने व मनपाने घेतलेला नाही असे वाटते. याला जबाबदार असणाऱ्या पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार असल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड व आळंदी शहर सचिव रवी भेंकी यांनी म्हटले आहे. लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात नाही तर संस्थेच्या माध्यमातून अंदोलन केले जाईल वेळप्रसंगी न्यायदेवतेकडे जाऊन न्याय मागु असा ईशारा संस्था अध्यक्ष विकास कुचेकर यांनी दिला आहे.