महायुतीला धक्का ! उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग; भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या गळाला

0
120

मुंबई, दि. 18 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासाआघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासाघाडीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आज शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मोठी इनकमिंग पाहायला मिळणार आहे. कोकणातील भाजपचा एक मोठा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेला एक नेता अनेक वर्षांनी पुन्हा स्वगृही परतणार आहे.

कोकणातील भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे हे देखील आज स्वगृही ठाकरे गटात परतत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबतच भाजपलाही ठाकरेंच्या सेनेकडून धक्का देण्यात आला आहे. सांगोल्यातून अजित दादा गटाचे दीपक आबा साळुंखे हे आज संध्याकाळी 4 वाजता पक्षप्रवेश करणार आहेत. तर भाजपच्या राजन तेली यांचा 5 वाजता होणार पक्षप्रवेश केला जाणार आहे. तसेच चिंचवड येथील अजित दादा गटाचे मोरेश्वर बोन्डवे यांचा 6 वाजता प्रवेश होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. मात्र सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात ठाकरेंच्या सेनेतून दीपक आबा साळुंखे उतरणार मैदानात उतरणार आहेत.

गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना तिकीट डावल्याने त्यांनी ऐनवेळी महायुतीचे शहाजीबापू पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत शहाजी बापू हे केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. आता दीपक साळुंखे यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.