पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : शिवसेनेचे नेते (शिंदे गट) आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाबाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. त्यानंतर आता महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावरती आली आहे.त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मंत्री तानाजी सावंतांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी हल्लाबोल केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीवर बसतं आणि कोणाला कोणाची गरज आहे, हे लक्षात येईल. मंत्री तानाजी सावंतांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी असा पलटवार केला आहे. पण यातून महायुतीचा फुटीच्या दिशेने प्रवास सुरु झालाय का? या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो अन उठून बाहेर पडलो की आम्हाला उलटी आल्यासारखं होतं. तानाजी सावंतांच्या या वक्तव्याला शेळकेंनी असं उत्तर दिलं आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीच्या सत्तेत आल्यापासून तानाजी सावंतांच्या पोटात नेमकं काय गेलंय हे माहीत नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलून घेऊ द्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीवर बसतं आणि कोणाची गरज कोणाला आहे, हे लक्षात येईल. असा पलटवार शेळकेंनी केला आहे.
काय म्हणालेत शेळके?
राष्ट्रवादी महायुतीच्या सत्तेत आल्यापासून तानाजी सावंतांच्या पोटात नेमकं काय गेलंय हे माहीत नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलून घेऊ द्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलो आणि कोणाची गरज कोणाला आहे, हे लक्षात येईल.
आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.
तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणालेत.