महायुतीच सत्तेत येणार, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

0
56

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. अशाच भाजपच्या एका मोठ्या नेत्याने दिलेली मुलाखत चर्चेतआली आहे. या मुलाखतीत आगामी निधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपचे नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत अनेक पैलूंवर मते व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत कसे चित्र आहे यावर बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा फक्त .०३ टक्के जास्त मिळाली. प्रत्येक निवडणुकीत एक थर्ड फ्रंट असतो त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत होत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत होत असतो. या तिसऱ्या आघाडीत असलेले पक्ष ५ ते १० हजार मते घेतात किंवा काही ठिकाणी विजयी देखील होतात. जर आजची परिस्थिती लोकसभेसारखीच आहे असे ग्रृहीत धरले तर जो फायदा लोकसभेत मविआला झाला तसा फायदा महायुतीला होईल. या विभाजनाचा फायदा महायुतीला होईल असे सांगताना तावडे म्हणाले की, पण आता परिस्थिती बरीच बदललेही आहे. लाडकी बहिण योजनेमुळे गोष्टी फार बदलल्या आहेत.