आज सकाळी ७ वाजता काटेवाडी गावातील मतदान केंद्रावर सुनेत्रत्रा वहिनी पवार यांनी त्यांच्या सासूबाई म्हणजेच आई श्रीमती आशाताई पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
आता पुढचा प्रवास असेल तो तमाम जनतेच्या हक्कासाठी जागरूक राहण्याचा. आजपर्यंत लाभलेली तुमच्या सर्वांची सोबत, प्रेम, आशिर्वाद या पुढच्याही प्रवासात कायम राहुद्या, या अपेक्षेसह आपण सर्वांनी आपल्या उज्वल भवितव्यासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी आवर्जून मतदानाचा हक्क बजावावा असे नम्र आवाहन यावेळी सुनेत्रा पवार यांनी मतदारांना केले.












































