महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार यांनी कोथरूडमधील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कामगारांशी संवाद साधत प्रचार दौऱ्याला केली सुरवात..!

0
137

सुनेत्रावहिनी पवार यांनी आज प्रचार दौऱ्याला कोथरूड मधील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कामगारांशी संवाद साधत सुरुवात केली. यावेळी त्यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर आपण एकत्र मिळून सर्व तोडगा काढू असा विश्वास व्यक्त केला. तसेच कामगारांना घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन सुनेत्रा वहिनी पवार यांनी केले. तसेच कामगारांनी सुद्धा आम्ही महायुतीच्या सोबत असल्याचा सुनेत्रावहिनी पवार यांना विश्वास दिला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.