महायुतीचे रिपोर्ट कार्ड प्रसिध्द; ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये

0
2

मुंबई, दि. 16 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यानंतर महायुतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे उद्घाटन आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.

तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, त्याला महायुतीकडून उत्तर देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, विरोधकांनी आमची टिंगलटवाळी केली, विरोधक गडबडलेले आहेत, ते घाबरलेत असं म्हणणार नाही पण गडबडले आहेत, असं अजित पवार म्हणाले. तर ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.

महायुतीची पत्रकार परिषद, अजित पवार काय म्हणाले?
आमच्या समोरच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. आमचे महायुतीचे 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. यांनी तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली. लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली.

काही तरी बोलायचं आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवायचं. सुटसुटीत दोन पानांचं हे रिपोर्ट काढले आहे. हा बदलाचा अहवाल आहे. आमच्या मेहनतीचा हा लेखाजोखा आहे.

आमचे विरोधक थोडे गडबडले आहेत. घाबरलेत असं म्हणणार नाही, पण गडबडले आहेत.

देवेंद्र फडणवीस
काय म्हणाले?
– निवडणुकीचा शंखनाद झालाय
– आमच्यासाठी शंखानाद तर इतरांसाठी ऐलान झालंय
– आम्ही संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आज मांडत आहोत
– स्थगिती सरकार गेल्यावर गती आणि प्रगतीचे सरकार राज्याने पाहिले
– मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात परिवर्तनशील योजना महाराष्ट्रात आणल्या गेल्या
– शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
– महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार आहे याचं काम सुरू आहे
– साडेआठ रुपये दराने मिळणारी वीज तीन रुपये दराने मिळणार आहे
– वीजबिल माफीचा निर्णय विचार करूनच घेण्यात आला आहे

– मविआ काळात एकाही प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळाली नव्हती
– आम्ही 145 प्रकल्पांना सुधारित मान्यता दिल्याने 22 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे
– वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प मंजूर करून 55 टीएमसी पाण्याचा प्रश्न निकाली काढून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे
– सिंचन क्षेत्रात भरपूर काम केलंय
– होमगार्डच्या वेतनात भरघोस वाढ करून दिली
– वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळे तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न
– अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख तरुणांना उद्योजक बनविले
– पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही महामंडळ करून आम्ही विचार केला