महाविकास आघाडीचे मुंबईतील ३६ जागांचा वाटप फायनल

0
97

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईत कोण किती जागांवर लढणार याबद्दल मविआच्या तिनही पक्षांची सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे महायुतीतील भाजपने देखील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बैठका सुरू केल्यात. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील जागांसाठी आढावा बैठक घेतली असल्याची माहित आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईसाठी महाविकास आघाडीचा २०+०९+०७ असा फॉर्म्युला ठरलाय. ३६ पैकी २० जागांवर ठाकरेंची शिवसेना, ९ जागांवर काँग्रेस तर सात जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी लढणार असल्याचे बोलले जात आहे.