महाबाईक रॅलीद्वारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

0
2
  • चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना अभिवादन करून केली प्रचाराची सांगता
  • महाबाईक रॅलीतही कार्यकर्त्यांनी घडवले शांतता व शिस्तबद्धतेचे दर्शन
  • रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय उत्स्फूर्त सहभाग
  • चिंचवडकर म्हणतात; “महाबाईक नव्हे ही तर महाविजय रॅली

चिंचवड दि. १८ (पीसीबी)- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण मतदारसंघात भव्य महाबाईक रॅली काढण्यात आली. या महाबाईक रॅलीच्या माध्यमातून शंकर जगताप यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मतदारसंघातील नागरिकांना अभिवादन केले.

लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून या महाबाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ही रॅली पिंपळे गुरव मेन बस स्टॉप मार्गे सृष्टी चौक, पिंपळे गुरव – सुदर्शन नगर चौक, पिंपळे गुरव – स्वराज्य चौक – काटे पेट्रोलपंप – महादेव मंदिर, पिंपळे सौदागरनंतर रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जगताप यांनी अभिवादन केले. पुढे ही रॅली गोडांबे चौकमार्गे नखाते वस्ती चौक, रहाटणी – रहाटणी फाटा – काळेवाडी फाटा – संदीप कस्पटे यांचे जनसंपर्क कार्यालय – छत्रपती चौक – म्हसोबा चौक – दत्त मंदिर चौक, वाकड – उत्कर्ष चौक – डांगे चौक – पद्मजी पेपर मिल, दत्त नगर – मोरया गोसावी मंदिर, चिंचवड – चाफेकर चौक, चिंचवड – प्रेमलोक पार्क, दळवी नगर – दळवी नगर – आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर – स्पाईन रोड, वाल्हेकरवाडी – वाल्हेकरवाडी – नॅनोस्पेस होम्स चौक – शिंदे वस्ती – एस. बी. पाटील रोड – चंद्रभागा कोर्नर, रावेत – मुकाई चौक, किवळे – किवळे गावठाण – सिमबोयसीस कॉलेज मामुर्डी – मामुर्डी गावठाण – साई नगर – शिंदे पेट्रोल पंप – विकास नगर – टी.सी. कॉलनी अशी होत मुकाई चौक, रावेत या ठिकाणी ही रॅलीची सांगता करण्यात आली.

यावेळी प्रत्येक गावागावात आणि चौकाचौकात मोठ्या संख्येने एकत्रित येऊन ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि फुलांची उधळण करत या रॅलीचे व शंकर जगताप यांचे जोरदार स्वागत केले. तसेच या रॅलीमध्ये सहभागी झाले. या रॅलीत महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग लक्षणीय आणि उत्स्फूर्त पाहायला मिळाला. तर मतदारसंघातील विविध सामाजिक संघटनांनी रॅलीत शंकर जगताप यांना पाठींब्याचे पत्र देत त्यांना १०० टक्के मतदान देणार असल्याचा विश्वास दिला.

या महाबाईक रॅलीत आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, रिपाइं (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, यांच्यासह चिंचवड मतदारसंघातील महायुतीच्या सर्वच घटकपक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान, हजारोंच्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी या महाबाईक रॅलीत शिस्तबद्ध आणि शांततेचे दर्शन घडवत सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून कार्यकर्त्यांचे कौतुक होत होते. ही महाबाईक रॅली पाहून नागरिकांनी ही जणू काही ‘महाविजय रॅली’ असल्याची भावना व्यक्त केली.

मागील अनेक वर्षांपासून चिंचवडच्या जनतेने स्व. लक्ष्मणभाऊ जगताप व आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून आमच्यावर प्रचंड विश्वास व्यक्त करून आम्हाला भरभरून प्रेमही दिले. यावेळीही तुमचा हाच विश्वास आणि प्रेम तुमच्या मतरुपी आशीर्वादातून मला मिळावा अशी प्रार्थना मी आपणांस करत आहे. मी आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आवाहन करतो की, येणाऱ्या २० तारखेला आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून एक सक्षम आणि प्रगतिशील महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा जनतेचे सरकार म्हणजेच आपले महायुतीचे सरकार आणण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान द्यावे.