आमदार महेश लांडगे यांना मोठा झटका….
दि.०२(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपचा दुसऱ्या टर्म मधील पहिला महापौर होण्याचा मान रवी लांडगे यांना मिळाला आहे. रवी लांडगे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. उपमहापौर पदी भाजपचे निष्ठावान शीतल उर्फ विजय शिंदे यांची निवड झाली आहे. भाजप आणि रा.स्व.संघाने महापालिकेतील पक्षांतर्गत गटबाजी सत्ता समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ज्या रवी लांडगे यांना शिवसेनेतून पुन्हा भाजपमध्ये घेण्यासाठी कडवा विरोध केला होता त्या रवी लांडगे यांनाच महापौर पदावर संधी मिळाल्याने आमदारांना मोठा झटका समजला जातो.
पिंपरी चिंचवड महापौर पदी भाजपच्या रवी लांडगे यांची वर्णी लागणार हे निश्चित झालं. रवी लांडगे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक झालेत. त्यामुळं ते महापौर पदाचे प्रबळ दावेदार होते. अपेक्षेनुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी रवी लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मात्र यानिमित्ताने शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंच्या तोंडाला पानं पुसली गेलीत. चिंचवडचे आमदार शंकर जगतापांनी त्यांचा काटा काढला अशी चर्चा शहरात रंगलेली आहे. विधानसभेवेळी काटेंनी जगतापांविरोधात नाराजांची फळी उभी केली होती. याचा बदला जगतापांनी आत्ता काढल्याचं बोललं जातंय. खरं तर रवी लांडगे भाजपचे निष्ठावंत आहेत. मात्र विधानसभेपुर्वी रवी लांडगेनी ठाकरे सेनेत प्रवेश केला आणि पालिका निवडणुकांवेळी ते पुन्हा स्वगृही परतले. 2017 नंतर या ही पालिका निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक होण्याची किमया त्यांनी केली. त्याची बक्षिसी म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातली.
पक्षांतर्गत आणि संघाचा आग्रह लक्षात घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज सकाळी अखेर रवी लांडगे यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. कटुता दूर कऱण्यासाठी म्हणून भोसरीतील गावकी-भावकीच्या बैठकीत महेश लांडगेनी रवी लांडगेना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर काही तासांत रवी लांडगे महापौर होणार हे जाहीर झालं.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने पहिलंच खातं उघडलं ते म्हणजे रवी लांडगे हे बिनविरोध झाले आहेत. विशेष म्हणजे 2017 ला भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नेस्तनाबूत केला होता, त्यावेळीही रवी लांडगे यांनी भाजपचं खातं उघडलं होतं. आता पुन्हा एकदा रवी लांडगे बिनविरोध झाले आहेत. ते प्रभाग 6 मधील ब जागेवर नशीब आजमावत होते. अजित पवार राष्ट्रवादीचे निलेश सूर्यवंशी यांच्या ओबीसी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्यानं, त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यानंतर अपक्ष म्हणून दोन अर्ज उरले होते. त्यात रवी यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे यांचा एक आणि प्रसाद ताठे यांचा दुसरा अर्ज होता. पत्नी तर माघार घेणार होत्याचं, प्रश्न ताठे यांचा होता. लांडगे यांनी त्यांची मनधरणी केली अन् ताठे यांनीही निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे रवी लांडगे (Ravi Landge) सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाले आहेत. आता, त्यांच्या विजयाची केवळ घोषणा बाकी आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये उपमहापौर पदाचे उमेदवार नाराज, भाजपचे शीतल शिंदे पालिकेत निघून गेले
पिंपरी चिंचवड महापौर पदासाठी तीव्र इच्छुक असणारे निष्ठावंत शीतल शिंदेंना डावलण्यात आलं आणि त्यांचं नाव उपमहापौर पदासाठी जाहीर करण्यात आलं. यामुळं नाराज झालेले शिंदे पालिकेतून निघून गेलेत. शीतल शिंदे हे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झालेत. पालिकेत भाजपचे केवळ तीन नगरसेवक होते, तेंव्हापासून शिंदे हे नगरसेवक राहिलेत. मात्र 2017 ते 2022 दरम्यान एक ही पद पदरी न पडलेल्या शिंदेंना यावेळी पक्ष न्याय देईल, अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा डावलण्यात आल्यानं ते प्रचंड नाराज झालेत, म्हणून अर्ज न भरण्याची भूमिका शिंदेंनी घेतलीये. आता वरिष्ठ याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
वैयक्तिक परिचयाचा तपशील
नाव – : श्री. रवि बाबासाहेब लांडगे
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कै. श्री. बाबासाहेब लांडगे यांचा मुलगा, आणि भाजप चे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अंकुशराव लांडगे यांचे पुतणे.
१) जन्म दिनांक : २९/०८/१९८५
२) जन्म ठिकाण : भोसरी (पिंपरी-चिंचवड), तालुका : हवेली, जिल्हा : पुणे
३) शिक्षण : डी. फार्मसी
४) ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी
५) सध्याचा व्यवसाय : शेती, उद्योग व समाजकाम
६) कौटुंबिक माहिती : विवाहित
७) पत्नी/पत्नीचे नाव : सौ. रवि दगडे (माजी नगरसेविका पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
८) अपत्ये : एकूण : २ – मुलगा : १, मुलगी : १
९) धर्म : हिंदू – मराठा
१०) अ) कायमचा पत्ता : आनंद दर्शन, सिद्धेश्वर सोसायटी, घावडे वस्ती, भोसरी, पुणे – ४११०३९
ब) पत्रव्यवहाराचा पत्ता : आनंद दर्शन, सिद्धेश्वर सोसायटी, घावडे वस्ती, भोसरी, पुणे – ४११०३९
११) संपर्क : मोबाईल क्रमांक : +९१ ९८२३६२७६८४
१२) छंद आणि विशेष आवड : शेती, वाचन, खेळ
१५) राजकीय कारकीर्द :
: युवा मोर्चा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर
: माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
(सन २०१७ ते २०२२)
१६) सामाजिक क्षेत्र :
: संस्थापक अध्यक्ष – आनंद ग्रुप, पुणे
: अध्यक्ष – कै. अंबुसराव लांडगे प्रतिष्ठान
: अध्यक्ष – सिद्धेश्वर युवा क्रांती मित्र मंडळ
: अध्यक्ष – शिव गणेश मंदिर समिती
१७) क्रीडा क्षेत्र :
: अध्यक्ष – सिद्धेश्वर क्रिकेट आणि मार्शल युद्ध संघ
: प्रमुख आयोजक – क्रिकेट स्पर्धा
१८) कला क्षेत्र :
: प्रमुख आयोजक – दिवाळी पहाट
: प्रमुख आयोजक – दसरा डी.जे. मिरवणूक कार्यक्रम
: दसरा पुणे फेस्टिव्हल
: प्रमुख आयोजक – नविन मराठी कलाकार डान्स स्पर्धा
१९) सांस्कृतिक क्षेत्र :
: प्रमुख आयोजक – शिव गणेश मंदिर समिती अखंड हरिनाम सप्ताह
(२५ वर्षांपासून)
२०) आरोग्य क्षेत्र :
: प्रमुख आयोजक – दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी
: रक्तदान शिबिराचे आयोजन
२१) रोजगार क्षेत्र :
: प्रमुख आयोजक – कै. अंबुसराव लांडगे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी
रोजगार मेळाव्याचे आयोजन
भोसरी परिसरात केलेले कार्य
आमच्या कुटुंबाचे प्रमुख व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष कै. अंबुसराव लांडगे यांची राजकीय वाटचाल २००१ मध्ये हत्या झाली. त्यानंतर अवघ्या २२ व्या वर्षी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. २००७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथम प्रमुख जबाबदारी पार पाडत माझी पत्नी सौ. आशाताई अंबुसराव लांडगे यांना नगरसेवक म्हणून महायुतीच्या तिकीटावर निवडून आणले.
भाजपने २०१५ मध्ये युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्याचा उपयोग २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यात मी सिंहाचा वाटा उचलला. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलो. मी नगरसेवक
म्हणून प्रभागातील कामकाज माझी विधानसभेत मतदारसंघातील नागरिकांच्या विविध अडचणींची तसेच समस्या सोडविण्याचे काम केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत माझ्या दबदब्यामुळे अनेक रखडलेल्या कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्या वेळेस आंदोलन उभे करून मी करून पाडण्याचे काम केले.
कौटुंबिक पार्श्वभूमी
माझे वडील कै. अंबुसराव लांडगे यांनी जनता आंदोलनात असताना पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी पक्ष उभा केला. ते १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले आणि त्यानंतर माझे गुरु कै. अंबुसराव लांडगे हे १९९२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात सर्वच स्तरांवर काम केले. माझी पत्नी सौ. आशाताई अंबुसराव लांडगे २००७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. २०१२ साली माझी पत्नी सौ. आशाताई अंबुसराव लांडगे महानगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. २०१७ मध्ये मी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलो.







































