दि . १६ (पीसीबी) – अजित दादांनी पुणे शहरात मोठं काम केलं आहे. आता निवडणुकीला सामोरे जायचं आहे. केंद्र सरकार पुरस्कृत अनेक योजना शहरात येत आहेत. नुसत्या टाळ्या वाजवून चालणार नाही तर विधानसभेच्या पेक्षा जास्त यश मिळेल ही अपेक्षा असल्याचं वक्तव्य खासदार सुनिल तटकरे यांनी केलं. पार्थ पवार यांनी हे कार्यालय दिलं आहे, ते आपल्याला कायम देतील असेही तटकरे म्हणाले. अनेक जिल्ह्यात महापालिकांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना समजून उद्या आपण काम करणार आहोत. निवडणुकीची पूर्व तयारी करण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचे तटकरे म्हणाले.
अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुण्यातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थितीत होते. या कार्यक्रमात यावेळी तटकरे बोलत होते.
1971 मध्ये सायकल रिक्षा घेऊन मी या पुण्यात फिरलो होतो. 21 व्या शतकात अजितदादा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं काम केलं आहे. अजितदादांच्या खांद्यावर जबाबदारी आल्यावर पिंपरी चिंचवड सुद्धा मोठं शहर झाल्याचे तटकरे म्हणाले. पुणेरी पाट्या सुद्धा इथे आहेत, मराठी भाषेचा सगळ्यात चांगला वापर करत असेल तर तो पुण्यात केला जातो. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक सामूहिक निर्णय घेतला की एनडीए मध्ये सहभाग घेतला. 2 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला आहे. आज एक अद्यावत कार्यालय पुणे शहरात झालं आहे, याचा सार्थ आनंद मला झाला असल्याचे अजित पवार म्हणाले. तीन दिवस सुभाष जगताप तर तीन दिवस सुनील टिंगरे हे कार्यालयात बसणार आहेत आणि एक दिवस सुट्टी घेणार असे तटकरे म्हणाले. तुम्ही (टिंगरे) विधीमंडळात आला नाहीत याचं शैल्य आम्हाला असल्याचे तटकरे म्हणाले.
निवडणूक जवळ येत आहेत, आपण युतीमध्ये आहोत, युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत असे तटकरे म्हणाले. महापालिका निवडणुका 2017 मध्ये झाल्या आहेत. या ना त्या कारणाने निवडणुका झाल्या नाहीत, आता 27 टक्के आरक्षणाच्या सह निवडणुकीला सामोरे जावं लागणार असल्याचे तटकरे म्हणाले