महापालिकेला आज सुट्टी; जनसंवाद सभा होणार नाही

0
333

पिंपरी दि. २६ (पीसीबी) – . पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दर सोमवारी घेण्यात येणारी जनसंवाद सभा आज सोमवारी होणार नाही. आज घटस्थापना असल्यामुळे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज सभा होणार नसून थेट पुढच्या सोमवारी (दि.3) ऑक्‍टोबर रोजी जनसंवाद सभा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा 13 मार्च रोजी कार्यकाळ संपला. त्यामुळे 13 मार्चपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय राजवटीत नागरिकांची कामे थांबू नये, यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी दर सोमवारी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभेचे आयोजन करण्यास सुरूवात केली. सुरूवातील या जनसंवाद सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता.

जनसंवाद सभेत केलेल्या सूचना, प्रश्‍न अथवा तक्रारींचा निपटारा वेळेत होत होता. मात्र, जनसंवाद सभांमध्ये त्याच-त्याच समस्या, प्रश्‍न येत आहेत. त्यामुळे जे प्रश्‍न सुटण्यासारखे नाहीत. त्या प्रश्‍नांवर अद्याप कोणताही निर्णय होत नसल्याने नागरिकांचा जनसंवाद सभांना दिवसेंदिवस प्रतिसाद कमी होत आहे.