पिंपरी दि.२७ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.