महापालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण

0
114
crime

दि ६ जुलै (पीसीबी ) निगडी, –
सार्वजनिक शौचालयावरील ड्रेनेजची पाईपलाईन फुटल्याने ती दुरुस्त करत असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला एकाने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी एक वाजताच्या सुमारास निगडी गावठाण येथे घडली.

मल्हारी शामराव सकाटे (वय 44, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोमीन (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी गावठाणातील साई मंदिराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या टेरेस वरील ड्रेनेजची पाईपलाईन फुटली होती. ती दुरुस्त करण्याचे फिर्यादी मल्हारी हे काम करीत होते. त्यावेळी आरोपीने त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा मल्हारी यांनी जाब विचारला असता आरोपीने त्यांना सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.