महापालिकेच्या वतीने मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत, तर ढोल पथकांचा करण्यात आला सन्मान

0
269

पिंपरी, दि. २९ सप्टेंबर २०२३ :- पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करीत वरुणराजाच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात शहरवासियांनी गणरायाला निरोप दिला. उत्साहात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे पिंपरी आणि चिंचवड येथे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील कराची चौक आणि चिंचवड येथील हुतात्मा चापेकर चौक येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. याठिकाणी परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत विविध गणेश मंडळांच्या कला व क्रीडा पथकांद्वारे महापालिकेच्या नियंत्रण कक्षासमोर ढोलताशांच्या गजरात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी काठी अशा शिवकालीन साहसी खेळांचे व कलांचे चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करण्यात आले. या पथकांमध्ये लहान मुलांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. लहान मुलांनी सादर केलेल्या साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल पथकांनी धरलेल्या ठेक्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत केला.महापालिकेच्या वतीने या पथकांच्या प्रतिनिधींचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.

पिंपरी येथे परिसरातील प्रमुख ३५ गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उपआयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अब्दुल शेख, नितीन निंबाळकर, उपअभियंता विकास घारे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे यांच्यासह पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, पितांबर लोहार, नारायण बडगुजर, अमोल काकडे, अमोल शित्रे, लीना माने, आशा साळवी, रविंद्र जगधने,सीताराम मोरे, देवा भालके, विकास गायकांबळे आदींनी या मंडळांचे स्वागत केले. महापालिकेच्या कर्मचा-यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.

हुतात्मा चापेकर चौक, चिंचवड येथील नियंत्रण कक्ष येथे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, माजी महापौर अपर्णा ढोके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक नामदेव ढाके, माऊली थोरात, ऍड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, गोविंद पानसरे, शितल शिंदे, अश्विनी चिंचवडे, मारूती भापकर, राजेंद्र गावडे यांच्यासह उपआयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि पत्रकार तसेच मान्यवरांनी गणेशमंडळ प्रमुखांचे स्वागत केले. सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद, निर्माल्य कुंड, मूर्ती संकलन केंद्र अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. शहरातील विविध विसर्जन घाटांवर गणेश विसर्जन पार पडले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. बहुतांश मंडळांनी स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला. गणपतीदान उपक्रमाला देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांनी सर्व प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी करुन अधिकारी कर्मचा-यांना विविध सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. जीवरक्षक, अग्निशमन दल, सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, आरोग्य पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा याठिकाणी तैनात करण्यात आली होती.

अ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ८ हजार ३५ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर सुमारे २१ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. ब क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ४७ हजार ७७५ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर ४५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. क क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे १८ हजार ८० गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर ३६ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. ड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे १५ हजार ४२२ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर १९ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. इ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे १८ हजार ५०० गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर १४ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. फ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे २९ हजार ९७० गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर सुमारे १४ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. ग क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ८ हजार ६०४ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर १८ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. ह क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ११ हजार ३४७ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर १५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले.