महापालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

0
19

पिंपरी, दि. ११ – थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले हे भारताच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. त्यांनी स्त्रीशिक्षण, शेतकऱ्यांचे हक्कासाठी तसेच सामाजिक विषमतेविरूध्द संघर्ष करत समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले. याशिवाय त्यांची समता, शिक्षण आणि न्याय ही मूल्ये एक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी कायम मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विनय ओव्हाळ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संयोजन समितीचे सदस्य गणेश भोसले, अनिता केदारी, चंद्रकांत पाटील, लेखाधिकारी चारूशिला जोशी, कर्मचारी महासंघाचे मनोज माचरे, विजया कांबळे, कामगार नेते गणेश भोसले,  सामाजिक कार्यकर्ते शंकर लोंढे, विशाल जाधव, कैलास सानप, तुकाराम गायकवाड,पांडुरंग परचंडराव, सोमनाथ साबळे, उपलेखापाल अंकुश जाधव आदी उपस्थित होते. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई स्मारक येथील कार्यक्रमास महापालिका अधिकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, नितीन घोलप, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र तायडे, अण्णा कुदळे, ॲड. विद्या शिंदे, कविता खराडे, रोहिनी रासकर, शारदा मुंढे, निखील दळवी, सुहास कुदळे, किशोर कुदळे आणि महापालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. 

महात्मा जोतीराव फुले हे थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी वर्णभेद, अनिष्ट रूढी आणि अंधश्रध्दा विरोधात प्रभावी लढा दिला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मिळून त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, जे त्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल होते. शेतकरी, मजूर आणि दलित वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी सतत आवाज उठवला, तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समाजात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी जीवन व्यतीत केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.