महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी अमित पंडीत

0
285

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमित पंडीत यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केला असून पंडीत यांच्याकडे ब क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे.

महापालिकेमध्ये प्रशासन अधिकारी पद रिक्त होते. त्यानुसार नगरविकास विभागाने सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमित पंडीत यांची पिंपरी पालिकेच्या प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पंडीत यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदासह ब क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभारही सोपविण्यात आला आहे. याबाबत पालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आदेश काढला आहे.